न्यूयॉर्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘आयबीएम’ने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याबाबतची माहिती आयबीएमचे मुख्य संपर्क अधिकारी (सीसीओ) जोनाथन अदाशेक यांनी कर्मचाऱ्यांसोबत ७ मिनिटांच्या बैठकीत दिली.
कपातीची घोषणा करताना, या कपातीअंतर्गत कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे याबाबत जोनाथन यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.
यावर्षी जानेवारीमध्येच आयबीएमने सांगितले होते की, सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येईल.