नवी दिल्ली : वाराणसीतील गंगा-आरतीच्या धर्तीवर दिल्लीच्या वासुदेव घाटावर रोज संध्याकाळी यमुना आरती सुरू करण्यात आली असून यामुळे दिल्लीमध्ये वाराणसीचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाने निर्मिलेल्या या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आले. हा घाट यमुना घाट व निगम बोध घाट यांच्या दरम्यान यमुनेच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे.

कचरा आणि मलबा साठल्यामुळे या घाटावर फारसे कोणी जात नसे. मात्र दिल्ली विकास प्राधिकरणाने या घाटाचे नक्षीदार मंडप, फुलांचे ताटवे, लाखो देशी वृक्षांची लागवड, यमुना मातेची प्रतिमा, ३०० किलो वजनाची आगळीवेगळी घंटा इत्यादी उभारून नूतनीकरण केल्यामुळे इथे पर्यटकांची आवक जावक वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे पार्किंगची स्वतंत्र व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!