विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याचा गौरव

घाटकोपर : सामाजिक, राजकीय,शैक्षणिक , वैद्यकीय , पर्यावरण आदी क्षेत्रात गेली १२ वर्ष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने गौरविण्यात करण्यात आला. कोकणातील मुंबईत येऊन विविध क्षेत्रात या मंडळींनी भरीव काम केले. या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
परेल येथील शिरोडकर हॉल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर होते. यावेळी बोलताना सातमकर म्हणाले की, मंडळ वा संस्था स्थापन करणं सोपं आहे मात्र ते सातत्याने चालवणं फार कठीण आहे. कठीण काम आज १२ वर्ष पंचरत्न मित्र मंडळ करत असल्याचं कौतुक सातमकर यांनी केले . यावेळी अभिनेता उमेश मिटकरी, अभिनेत्री दिपिका पाटील , प्रसिध्द गायक दादुस (संतोष चौधरी) ,जगदीश पाटील , प्रासिध्द अभिनेते विद्याधर जोशी आदी उपस्थित होते. पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर , सचिव प्रदिप गावंड , खजिनदार सचिन साळुंखे यांच्या पुढाकाराने अनेक समाजपोयोगी कार्यक्रम राबविले जातात. शिरोडकर हाँल परेल येथे गौरविण्यात आले. पंचरत्न मित्र मंडळाने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *