सांगली : पुणे पोलिसांकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणी सकाळपासून चौकशी सुरू केली होती. यामध्ये कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज साठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये १४० किलोची ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० कोटींच्या आसपास किंमत असलेले ड्रग्ज जप्त करण्यात आले. पुणे पोलिस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी १४० किलोचे अंदाजे ३०० कोटींचे एमडी ड्रगचा साठा हा मीठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून याबाबतची अजूनही कारवाई सुरू आहे. आयुब मकानदारवर यापूर्वीही ड्रग तस्करीचा गुन्हा दाखल होता. तसेच तो सात वर्ष येरवडा कारागरात होता. कारागृहात पुण्यातील आरोपीची मकानदार याची ओळख झाली होती. त्यामुळे मकानदारकडे हा साठा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यासाठी पाठवण्यात आला होता याची माहिती मिळताच पुणे क्राईम ब्रँच आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने आज दिवसभरात कुपवाड मधील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत कारवाई केली.
पुण्यातील ड्रग्जचे सांगली कनेक्शन अखेर समोर आले आहे. पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले ३०० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची अजूनही कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *