काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांचं निधन
डोंबिवली : काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांचे आज सकाळी एम्स रूग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. रविवारी ते घरात अचानक खाली कोसळल्याने त्यांना डोंबिवलीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. म्हात्रे हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे. केडीएमसीच्या निवडणुकीत डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा या प्रभागातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुले नातवंडे असा परिवार आहे.
