डोंबिवली :  कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी गुन्ह्यात वापरलेली त्यांची परदेशी बंवतीचे रिव्हॉल्व्हर तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच महेश गायकवाड यांच्यावर फायर केलेल्या ६ गोळ्या तपासणीसाठी कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहेत.

आमदार गायकवाड तिसाई केबल या नावाने व्यवसाय आहे. केबल व्यवसायिक आमदार गणपत गायकवाड यांना १५ नोव्हेंबर २०१७ रोजी गुंड सुरेश पुजारी याचा पहिला फोन आला होता. त्यानंतर दुसरा फोन १७ नोव्हेंबर रोजी आला. त्यावेळी त्याने आमदार गायकवाड यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आमदार गायकवाड यांनी त्यावेळी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती. आयुक्तांच्या सूचनेनुसार आमदार गायकवाड खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार करण्यास गेले. खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदार गायकवाड यांना वाईट अनुभव आला. लोकप्रतिनिधीच्या तक्रारीची दखल पोलिस घेणार नसतील तर सर्व सामान्यांची काय अवस्था होईल, असा सवाल करत गायकवाड यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 

गृहखात्याने आमदार गणपत गायकवाड यांना अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना दिला. तेव्हापासून आजतागायत ते या परवान्याच्या आधारावर आत्मरक्षणासाठी परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगत आहेत. या रिव्हॉल्व्हरचा त्यांनी प्रतिस्पर्धी तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. पोलिसांनी अटकेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडील रिव्हॉल्व्हर आणि महेश गायकवाड यांच्या शरीरातील शस्त्रक्रिया करून काढलेली निष्प्रभ झालेली ६ काडतुसे तपासणीकरिता कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!