कल्याणात दिराकडूनच वहिनीवर बलात्कार 

कल्याण : पती मनोरूग्ण असल्याने दिरानेच वहिनीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना कल्याणात घडलीय याप्रकरणी दिराविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फेब्रुवारी महिन्यात पिडीत महिलेच्या पतीला ठाणे यथे मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले. पती आजारी असल्याने ती महिला कप बशी विकूनच कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. घराचा हिस्सा मागण्याच्या उद्देशाने तिचा दिर तिच्या घरी आला.  तिच्या असहाययतेचा फायदा उठवित त्याने तिच्यावर बलात्कार केला. मात्र याची कुठेही वाच्यता केल्यास तिला व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानंतर वारंवार त्याने तिच्यावर बलात्कार केला असे त्या पिडीत महिलेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. अखेर दिराच्या जाचाला कंटाळून तिने महात्मा पोलीस ठाण्यात दिराविरोधात तक्रार दाखल केलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *