नाशिक : अयोध्देतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयानंतर शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवटीच्या काळाराम मंदिरात सहकुटूंब पूजा केली. त्यानंतर शेकडेा शिवसैनिकांच्या उपस्थितीत रामकुंडावर गोदापूजन केले.
सोमवारी दुपारी उध्दव ठाकरे यांचे नाशिक शहरात आगमन झाले यानिमित्त शिवसैनिकांनी ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. चौका चौकात ठाकरेंच्या स्वागताचे मोठे मोठे फलक उभारण्यात आले होते तसेच ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली सायंकाळी उध्दव ठाकरे यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरात पूजा केली यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर ठाकरे यांनी रामकुंड परिसरात गोदापूजन केले.