स्व इंदिरा गांधीच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामने 

 देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त काँग्रसचे घाटकोपर पश्चिम विभागाचे तालुका अध्यक्ष गौरव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली अमृतनगर येथील अरुणोदय मैदान येथे माँ तुझे सलाम चषक 2017 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस प्रवक्ते , आमदार भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुंबई युथ काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर हे उपस्थित होते . बॅट हातात घेऊन मैदानात चेंडू टोलवत  आमदार भाई जगताप यांनी सामन्यांचे उद्घाटन केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *