आझाद नगरमध्ये नवीन  दुमजली शौचालय

घाटकोपर : पश्चिम विभागातील आझाद नगरमध्ये ६४ सीटचे सुलभ दुमजली शौचालय उभारण्यात आले या नवीन शौचालयाचे उद्घाटन खासदार किरीट सोमया यांंच्या हस्ते करण्यात आले. 1998 साली येथे ४८ सीटचे शौचालय बांधण्यात आले होते मात्र त्यांची दुरावस्था झाल्याने हे शौचालय कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता होती. स्थानिक नगरसेवक बाजार समितीचे सदस्य सुर्यकांत गवळी यांनी पालिकेच्या निधीतून जुने शौचालय तोडून त्या जागी नवीन शौचालय उभारले आहे. यावेळी चंदक्रांत मालकर , सत्यवान गवळी , संतोष गवळी , सनद ओझा , रवी पुंज , मनीष साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते नवीन शौचालय साकारण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यकत केलय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!