मुंबई : दहावी पास असणा-यांना सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे.या बँकेत मेगा भरती सुरू झाली आहे.नुकतीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी ९ जानेवारी २०२४ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे नोकरीच्या शेाधात असणा-या इच्छुकांना आता फटाफट अर्ज करावा लागणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत ४८४ रिक्त पदांसाठी मेगा भरती प्रकि्रया राबविली जात आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट दहावी पास आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची हीच मोठी संधी आहे. दहावी पास असलेले उमेदवार हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे थेट अर्ज करून थेट क्लर्क या पदावर नोकरी करू शकतात.

उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी www.centralbankofindia.co.in या साईटवर भेट द्यावी लागेल. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दल सर्व माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आँनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. मग अजिबात वेळ न घालता लगेचच अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *