जोपर्यंत जात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत उपोषणकर्ते मागे हटणार नसल्याचा निर्धार

अमरावती/ मंगेश तरोळे-पाटील : गेले पंधरा दिवसापासून जात प्रमाणपत्रासाठी अमरावती येथील आदिवासी विभागात उपोषणाला बसलेले आदिवासी महादेव कोळी समाजाचे नेते राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर हे जात प्रमाणपत्रासाठी उपोषणाला बसलेले आहेत. सध्या राजेंद्र जुवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. असल्याची माहिती बेरार संघटनेच्या वतीने प्रकाश पाटील फुकट यांनी दिली . जो पर्यंत जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ व बेरार आदिवासीं संस्थेने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *