शिवसेना उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

डोंबिवली : वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. ही बाब लक्षात घेता गेल्या अकरा वर्षापासून एंकरवाला , कच्छ युवक संघ डोंबिवली आणि शिवसेना शाखा क्रमांक ७४, गोपाळ नगर पाथर्ली येथील माजी नगरसेवक आणि उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदानाची शिबिर संपन्न झाली.त्या रक्तदान शिबिरात सुमारे १२५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिरात जमा होणाऱ्या रक्ताच्या बॉटल डोंबिवली येथील प्लाझमा ब्लड बँक येथे जमा केल्या. यावेळी काही डॉक्टर्स आणि शिवसेना पदाधिकारी आमोद वैद्य, तानाजी महागारे, कुणाल शेट्ये, संजय मांजरेकर , मंगेश मोरे, सुधीर माने, तुषार माने, अरविंद रोकडे, नरेंद्र पाटोळे, शांताराम पवार, प्रदीप पाटील यांनी ही रक्तदान केले.

या वेळी शिवसेना नेते बाळ हरदास, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा संघटक वैशाली दरेकर, शहर प्रमुख विवेक खामकर, विभाग प्रमुख मंगेश मोरे , शहर कार्यालय प्रमुख सतिश मोडक,कार्यालय प्रमुख शांताराम पवार ,शाखा प्रमुख,आमोद वैद्य ,राणी येवले ,तानाजी महागारे , ओंकार दळवी, युवा अधिकारी कुणाल शेट्ये, उपशाखा प्रमुख सुभाष सावंत, कदम काका,लोलम, शिरसेकर, शंकर मामा,दीपक औटी,जयेश मानकामे,भाटकर काका,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतात.त्या सर्वांना माझी विनंती आहे, यंदाच्या वर्षी शहरातील रक्तपिशव्यांची तूट लक्षात घेता रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा द्याव्यात, असेही उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!