इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त कल्याणात रॅली
 
कल्याण : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सोहळा कल्याणमध्ये सिटीजन फोरमच्या वतीने साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान इंदिरा  गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरवात करण्यात आली. नेहरू चौकातून सुरू झालेली रॅली महंमद अली चौक, शिवाजी चौक, सहजानंद चौक मार्गे काळा तलाव येथे रॅलीचे रुपांतर एका सभेमध्ये करण्यात आले.  विचारवंत आणि लेखक अनुउर्जाचे अभ्यासक राजा पटवर्धन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याची महती सांगितली. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी आर. बी. सिंग, विजय पंडित, राजू गवळी, प्रशांत तोशिन्वले, अब्दुल गफार शेख, योगेश घुगे, विद्या गोळे, धनजीभाई सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *