मुंबई (अजय निक्ते) : रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या रिलीजपासून चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी उसळली आहे. चित्रपटाने भारतात आजपर्यंत ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या छप्पर तोड कमाईने ‘अ‍ॅनिमल’ हा या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे रणबीर कपूर देखील सोशल मीडियावर चांगलात चर्चेत आला आहे.

‘अ‍ॅनिमल’ने १७व्या दिवशी भारतात १५ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपट भारतातील एकूण कमाईत ५१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे तर जगभरात चित्रपटाने ८०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला आहे. ‘भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांच्या यादीत या चित्रपटा ने चौथे स्थान पटकावले असून यापूर्वी ‘जवान’ , ‘पठान’आणि ‘गदर २’ या चित्रपटांनी भारतात सर्वाधिक कमाई केली होती.

अ‍ॅनिमल’ हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात रणबीर कपूर एका जबरदस्त भूमिकेत असून चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर आणि तृप्ती डिमरी हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. ‘अ‍ॅनिमल’च्या यशामुळे रणबीर कपूरचे स्टारडम रेटिंग वाढले आहे.
या यशाबद्दल रणबीर कपूरने रसिकांचे आभार मानले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणबीर ने लिहिले आहे की , अ‍ॅनिमल’च्या यशाबद्दल मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा चित्रपट यशस्वी झाला आहे. मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो.” भारतात आणि परदेशातही चांगली कमाई करत असल्याने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा देखील खूश आहेत.‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची कहाणी एका गुन्हेगारी संघटनेच्या मागे लागलेल्या पोलीस अधिकाऱ्याची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *