मुंबई/ श्रीराम कांदू : ऐन थंडीच्या मेासमात फळभाज्या तसेच पालेभाज्यांचे दर नेहमीपेक्षा वाढल्याचे दिसून येत आहेत. सद्यस्थितीत भाज्यांमध्ये भेंडीचे आणि गवारचे दर सर्वाधिक वाढले आहेत. भेंडी, गवार शंभर रूपये किलोपर्यंत पोहचली आहे. तर इतर भाज्यांचे दरही वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

अवकाळी पावसाने शेतक-यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यातून अजूनही सावरलेला नाही. दुसरीकडे थंडीचा मोसम भाज्यांसाठी अनुकूल समजला जातो. पण या मोसमात भाज्यांचे दर चढते आहेत. दोन आठवडयांपासून भेंडीच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत २४०० ते ३५०० रुपये क्विंटलने भेंडीची ठोक विक्री झाली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हीच आवक १५ ते १६ क्विंटलच्या घरात होत असून, ६००० ते ६५०० रुपये क्विंटलपुढेच त्याची घाऊक विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गवारची २५०० ते ३००० रूपये क्विंटलची विक्री ६००० रूपये क्विंटल पोहचली आहे त्यामुळे भेंडी गवारचे दर वाढले आहेत. भेंडी गवारची घाऊक विक्री होत प्रत्येक भाजांचा दर पाव किलोला २५ ते ३० रूपये आहे. १० रूपये पाव मिळणारा दुधी २० रूपये झाला आहे. घेवडा काकडा मिरची ८० ते १०० रूपये किलो, वांगी ८० रूपये किलो, टोमॅटो ८० रूपये किलो, भाज्या महागल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *