विरार : ऑडिशनच्या नावाखाली १८ वर्षीय तरुणीचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार वसई विरारमध्येघडला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. ऑडीशनच्या नावाखाली तरुणीचं अश्लील चित्रिवâरण करुन ते इंटरनेट आणि वेबसाईटवर प्रदर्शित केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.चित्रपट, मालिकामध्ये एक्स्ट्रा काम करणा-या तरुणीची चार जणांनी फसवणूक आणि बदनामी केली. तिचे अश्लील चित्रिकरण केले.
ते इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणी ही १८ वर्षांची आहे. अभिनेत्री बनण्यासाठी ती तरुणी मध्य प्रदेशहून मुंबईत आली होती. सध्या ती वसईत भाड्याच्या घरात रहाते. हिंदी चित्रपटात आणि मालिकामध्ये ती एक्स्ट्रा कलाकाराचे काम करते. एक नोव्हेंबर रोजी आरोपींनी त्या तरुणीला व्हॉटसअॅप कॉल केला होता.
फोन करुन आरोपींनी तरुणीला चित्रपटात काम देण्याच्या बाहण्याने ऑडिशनसाठी बोलवले. अर्नाळा बीच समोरील एका हॉटेलच्या कॉटेजमध्ये तरुणीला बोलावले होते.१८ वर्षीय तरुणी कामाच्या आशेपोटी दिनांक २ नोव्हेबर रोजी अर्नाळा येथे गेली. तिथे तिला प्रॉडक्शन कंपनीचे चार जण भेटले. त्यात एक दिग्दर्शक, एक कॅमेरामन, एक अभिनेता तसेच एक महिला मेकअप आर्टीस्ट अशा चौघांचा समावेश होता. चौघांनी तिला एका एका लॉजमध्ये ऑडिशनसाठी नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील दृश्य देण्यास भाग पाडले.ही दृ्श्ये केवळ ऑडिशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जाणार नाही, असे सांगितले.