डोंबिवली : डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी छापा मारून पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून पाच तरुणींची पोलीसांनी सुटका करून मसाज पार्लरचा मॅनेजर नितीन भुवड याला अटक केली. मात्र मसाज पार्लर चालवणाऱ्या मुकुंद वाघमारे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्व पेंढारकर कॉलेज परिसरात आर्किनिया इमारती मध्ये आर्चीड मसाज पार्लर मध्ये मसाज सेंटर च्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांनी एक इसम पाठवून खात्री केली. या पार्लर मध्ये मसाज च्या नावाखाली देहव्यापार सुरू होता. एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने मसाज पार्लरमध्ये अचानक छापा टाकला. या मसाज पार्लर मधून पाच तरुणींची सुटका केली तर मसाज पार्लर चा मॅनेजर नितीन भुवड याला बेड्या ठोकल्यात. तर मसाज पार्लर चालवणाऱ्या मुकुंद वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.