डोंबिवली, दि,06 : येथील मानपाडा रोडवरील नेकणी पाडा भागातील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात बेजबाबदार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दावडी गावात भगवान ठोंबरे हे कुटूंबासमवेत राहतात. त्यांची मुलगी तेजल (१५) ही परिसरातील एका खासगी शिकवणी वर्गात दररोज सात वाजता जाते. मंगळवारी सकाळी ती नेकणी पाडा भागातील रिजन्सी ते कावेरी चौक येथून शिकवणीसाठी पायी जात होती. नेकणी पाडा भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.गाडी थांबून जखमी मुलीला मदत करण्याऐवजी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला.पादचाऱ्यांनी या मुलीच्या कुटुंबीयांना संपर्क केला. तिला तातडीने रूग्णालयात नेले. तिचे वडील भगवान ठोंबरे(४७) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी कार चालकाचा शोध घेण्याची मागणी ठोंबरे कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!