माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांचे आयोजन
डोंबिवली : पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 64 च्या वतीने माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या सौजन्याने जनगणमन स्कूल, नेमाडे गल्ली, डोंबिवली (पश्चिम) येथे सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या कर्णपिशाच्च अर्थात अर्धसत्य या प्रयोग ठेवण्यात आला होता. या प्रयोगाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दशावतार पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंतांची हजेरी डोंबिवलीतील सामाजिक मंडळाचे पदाधिकारी, मॉर्निंग वॉक ग्रुपचे ज्येष्ठ पुरुष / महिला सभासद, शाळा कॉलेजातील तरुण मुलांनी मनमुराद आनंद लुटला.
विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहन खंदारे यांच्या हस्ते सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक सिद्धेश कलिंगण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
*****