‘सैराट’ चा हिंदी रिमेक ‘धडक’ च पोस्टर लाँच

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत रसिकांची मने जिंकणारा व बॉक्स ऑफिसवर कोटयावधींची कमाई करणारा अनेक पुरस्कारप्राप्त सैराट या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ ६ जूलै २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने ट्वीट करुन धडकच पोस्टर लाँच केलंय.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या धडकच पोस्टर लाँच करण्यात आलंय. शशांक खैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आर्ची च्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर परशाच्या भूमिकेत शाहीद कपूरचा भाऊ इशार खट्टर हे दिसणार आहेत. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘आर्ची’च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर ‘परशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *