डोंबिवली : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यात अडवून तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग; असे धमकावुन मारहाण केली. इतकेच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून पळून गेल्याची घटना कल्याणात घडली आहे. या तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हेमंत गमरे असे या आरोपीचे नाव आहे.

हेमंत गमरे याचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातून त्याने तरुणीच्या बहिणीचा पाठलाग करत जवळ पोहचत रास्ता अडविला. यानंतर तुझ्या बहिणीवर प्रेम करतो. ती माझ्याशी बोलत नाही. तिला सांग माझ्याशी लग्न करायला अशी धमकी दिली. हे ऐकून ही तरुणी घाबरली व ती पुढे चालू लागली. संतापलेल्या या तरुणाने त्या तरुणीला पकडून तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग अशी धमकी देत भर रस्त्यात मारहाण केली व  त्या तरुणीचा मोबाईल हिसकावून तो तरुण पळून गेला. 

घटनेची माहिती तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली. पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पेालिस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलिस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *