ठाणे : शहापूर तालुक्यातील शेणवे येथील बाजारपेठेत असलेल्या राजेश ज्वेलर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री रात्री दोन वाजता च्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी दुकानांची मागील भिंत फोडून दुकानातील दागिने लंपास केल्याची घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास येथे घडली येथे घडली आहे.या चोरीच्या घटनेमुळे शेणवे गाव बाजारपेठेत लोकांमध्ये एकच भितीचे वातावरण पसरले आहे.
सकाळी दोनच्या सुमारास घडली आहे.शेणवा येथील बाजारपेठेत निर्मल चौधरी यांच्या मालकीचे राजेश ज्वेलर्स हे दुकान आहे.या दुकानाच्या मागील बाजूची भिंत गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी फोडून मध्यरात्रीच्या दोनच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील मोडीत असलेले चांदीची सुमारे अर्धा किलो वजनाचे दागिने तसेच बेंटेक्स दागिने लुटमार करीत तेथून पोबारा केला आहे.नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळच्या सुमारास ज्वेलर्स मालक निर्मल चौधरी हे दुकान उघडण्यास आले असता भिंत फोडून ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.तथापि त्यांनी तात्काळ या चोरीच्या घटनेची माहिती किन्हवली पोलिसांना दिली असता पोलीस शेणवे बाजारपेठेत दाखल झाले पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या चोरीच्या घटनेची नोंद किन्हवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.या चोरीच्या घटनेचा तपास किन्हवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.