ठाणे, प्रतिनिधी : शहापुरात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून चौथ्या स्तंभाचा सन्मान करत स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील पेंढरघोळ येथील एका फार्म हाऊसवर केले होते. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा प्रमुख रुपेश दादा म्हात्रे वतीने पत्रकारांशी संवाद साधला यावेळी तालुक्यातील राजकीय विश्लेषक अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेले सेनेचे ठाणे जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे यांनी पत्रकारांनी संग्रहित केलेली अत्यंत महत्त्वाची माहिती कुठेतरी नोंद असावी यासाठी नोंदवही भेट दिली. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्र गुलवी,जयवंत तारमळे,गणेश राऊत, रविंद्र लकडे,रविंद्र मडके, योगेश भोईर,राजदीप जामदार,संजय सुरळके,रविंद्र खाडे, शशांक हरड, हरिश्चंद्र पाटील, रमेश विश,अविनाश शिंगे, प्रकाश फर्डे,भगवान फर्डे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *