यंदा देखील डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळीनिमित्त तरुणांत उत्साह पाहायला मिळाला. फडके रोडवर दिवाळी पहाट निमित्त आयोजित कार्यक्रमांना तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पारंपारिक वेशभूषेध नटलेल्या तरुण-तरुणींची गर्दी,गाण्यांची सुरेल मेजवानी, यासह विशेष आकर्षण ठरले ते जर्मनी मधून आलेल्या परदेशी पाहुण्यांची.

डोंबिवली चा जावई असलेला मारको दिवाळीनिमित्त फडके रोडवरील उत्साह अनुभवण्यासाठी जर्मनी हून पत्नी व कुटुंबासह डोंबिवलीत आलाय . फडके रोडवर फिरून तरुणांसोबत फोटो काढून सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *