कल्याण : येथील कोळसेवाडी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह एका उत्तरभारतीयास अटक करण्यात यश मिळविले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग, संशयीत गुन्हेगारांची तपासणी, गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना कोळसेवाडीचे वपोनि राजेश शिरसाठ यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला होते. या पथकाने गावठी बनावटीच्या कट्ट्यासह दानिश इश्तियाक अन्सारी (31) याला बेड्या ठोकल्या.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि दिनकर पगारे यांच्यासह सुशिल हांडे, विकास भामरे, सुरेश जाधव, सचिन कदम, रोहिदास बुधवंत, गोरक्षनाथ घुगे हे पथक रात्री गस्त घालत असताना आनंदवाडी भागातील डबल टॉवरजवळ एक इसम संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पोलिसांनी हटकताच त्याने धूम ठोकली. या पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. हा कट्टा त्याने उत्तरप्रदेशातून आणला असून हा कट्टा विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना कल्याणला आल्याचे त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *