शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे माजी नगरसेविका भारती मोरे यांचा स्तुत्य उपक्रम

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख तथा माजी सभागृहनेते राजेश मोरे आणि माजी नगरसेविका भारती राजेश मोरे यांच्यावतीने दत्तनगर आणि संगीतानगर, संगीतवाडी, आयरेविभाग, रघुवीरनगर प्रभागातील सुमारे दहा हजार नागरिकांना दिवाळी भेट म्हणून साडेपाच ते सहा किलोचे किट वाटप करण्यात आले.

या किटमध्ये दिवाळी फराळ साहित्य, उटणे, रांगोळी, कंदील आणि भेटवस्तूंचा समावेश आहे. प्रभागातील सुमारे १० हजार नागरिकांना या किटचे वाटप करण्यात आले. ही आनंदाची दिपावली भेट देत असते असे राजेश मोरे यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्वेतील मातोश्री सुभद्रा काशिनाथबुवा पाटील सभागृह, श्रीदुर्गामाता मंदिर, टंडन रोड, दत्तनगर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांची खूपच गर्दी झाली होती. शहरप्रमुख राजेश गो. मोरे आणि माजी नगरसेविका भारती राजेश मोरे यांच्या हस्ते नागरिकांना दिवाळी भेट वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकारी गजानन व्यापारी, कैलास आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *