कल्याण : धावल्या लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच, आता महिला होमगार्ड वर हल्ला झाल्याची घटना घडलीय. हा प्रकार कसारा लोकलमध्ये वासिंद ते आसनगाव दरम्यान घडला आहे. या घटनेनंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा 24 तासात मारुती आत्राम या आरोपीला अटक केली.

महिला रेल्वे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या नीरजा मुकादम या वासिंद ते आसनगाव दरम्यान महिला जनरल डब्यात पेट्रोलिंग करत असताना, एक प्रवासी महिला डब्यात शिरला. मुकादम यांनी त्याला महिला डब्ब्यातून उतरण्यास सांगितले. मात्र त्याने होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालत त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर वासिंद स्टेशन येताच त्याने स्टेशनवरून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महिला होमगार्डने मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने त्याचबरोबर एपीआय देशमुख ,पीएसआय जावळे ,पोलीस शिपाई शेवाळे ,खाडे, देसले, जाधव ,देवळे सह इतर कर्मचाऱ्यांनी कल्याण ते कसारा पर्यंत सर्व स्टेशनवर आरोपीचा शोध काढत 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *