डोंबिवली ; एमआयडीसीच्या निवासी विभागातील डोंबिवली जीमखाना परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या घरातून मोलकरीणने ४ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेत ९६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे कल्पना सुर्वे अशा या महिलेचे नाव असून ही महिला तक्रारदार महिलेच्या वडिलांकडे मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र कधीकधी ती मालकाच्या मुलीकडे घर सफाईस करण्यासाठी ये-जा करत होती आणि याच दरम्यान दोन महिन्यात तीने हळूहळू करत चार लाखाचे सोन्याचे ऐवज लंपास केले सदर प्रकरण महिलेच्या लक्षात येताच महिलेने टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता याचा तपास करत असताना पोलिसांनी या महिलेला बेड्या ठोकत पुढील तपास सुरू केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *