डोंबिवली : डोंबिवली, कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. दाट धुक्यामुळे समोरच्या गगनचुंबी इमारती हरवून गेल्या होत्या.

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण शहर परिसरात धुके पडण्यास सुरुवात झाली सुरुवात झाली. परंतु आज सकाळी पडलेले धुके अधिक गडद असल्याचे जाणवले सकाळच्या सुमारास नियमितपणे बाहेर पडलेल्या नागरिकांना या धुक्यामुळ सुखद धक्का बसला.

ऑक्टोबर हिट’चा चटकाही तापदायक ठरू लागला आहे. असह्य उन्हाळ्याचा सामना  नागरिकांना करावा लागत आहे. सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होते. दुपारी तर रखरखत्या उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सकाळी दाट धुक्यामुळे गारवा आणि दुपारी उन्हाचा प्रचंड त्रास असा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *