डोंबिवली : वांगणी येथे चॅम्पियन्स कराटे क्लबने सीकेसी सीरिज-2 या ठाणे चषक जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दिव्यातील केंट व्हॅली इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 5 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कांस्य अशा एकूण 11 पदकांची लयलूट करत 1 चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब पटकावला आहे. तनिष सकपाळ याने चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब पटकावून काता आणि कुमिते प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे.

शांभवी निंबाळकर (काता-रौप्य, कुमिते-रौप्य), हार्दिक सावंत (काता-रौप्य, कुमिते-सुवर्ण), भौमिक शेलार (काता – सुवर्ण, कुमिते- रौप्य), कुणाल सिंघ (काता-कांस्य ), वेदिका सुरवसे (काता-कास्य) यांनीही चांगली कमगिरी केली. सहभागी विद्यार्थांचे केंट व्हॅली इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या ट्रस्टी किरण मिश्रा, प्रिन्सिपॉल निशा सिंघ यांनी स्पर्धकांसह त्यांच्या ससेंसई प्रियांका निंबाळकर आणि सेंपाई करण बघेल यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *