किरीट सोमय्या साहेब,  दोन तिकिट खिडक्या कधी सुरू होणार  : घाटकोपरवासियांचा सवाल 
घाटकोपर :  पूर्वेकडील जुने तिकट कार्यालया तोडून  नवीन बांधण्यात आलेले आहे मात्र नवीन तिकीट खिडकीही प्रवाशांसाठी एक वर्षापासून असुविधेचे कारण ठरत आहे . या नवीन बांधण्यात आलेल्या 4 तिकीट खिडक्यांपैकी केवळ दोनच तिकीट  ख्रिडक्या सुरू आहेत.  गेल्या वर्षी 2016 रोजी खासदार किरीट सोमैया यांच्या हस्ते या नवीन तिकीट खिडक्यांचे  उदघाटन करण्यात आले होते मात्र एक वर्ष होऊनही दोन तिकीट खिडक्या बंद आहेत . प्रवाशांचा वेळ अमूल्य वेेळ वाचावा म्हणून नवीन तिकिट खिडक्या होत आहेत असे खासदार किरीट सोमयया यांनी उद्घाटनप्रसंगी म्हणाले होते. मात्र  दोन खिडक्या बंद असल्याने प्रवाशांचा रांगेचा सामना करावा लागतो. त्यामुळे बंद असलेल्या दोन तिकिट खिडक्या कधी सुरू होणार, असा सवाल घाटकोपरवासिय करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *