रिपाइंच्या रोजगार उद्योग निर्माण समितीच्या

महाराष्ट्र कोअर कमिटीवर अंकुश गायकवाड यांची निवड

डोंबिवली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या रिपाइं रोजगार उद्योग निर्माण समितीची महाराष्ट्र राज्याची कोअर कमिटी बनविण्यात आली आहे. या समितीवर डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याची ५१ सदस्यांची कोअर कमिटी बनविण्यात येत आहे. त्यामध्ये १) दीपक गमरे (मुंबई), अँड. बबनराव मोरे (मुंबई) , सुमित वजाळे या सदस्यांचीही समावेश करण्यात आलाय. लोणावळा येथे नुकताच रोजगार उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर पार पडलेया राज्यस्तरीय शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानुसार रिपाई रोजगार उद्योग निर्माण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ही समिती तयार करण्यात येत आहे. तरूणांना रोजगार आणि उद्योगाची आवड निर्माण करून, त्यांना मार्गदर्शन करणे. व रोजगार उद्योगासाठी या समितीकडून सहकार्य केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *