ठाणे : एकात्मिक आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी उत्कृष्ट वक्ते,संघटक व अभ्यासू व्यक्तीमत्वाचे प्रा.रविंद्र राठोड यांची शहापूर प्रकल्पाचे अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली .

शरद पांढरे(कार्याध्यक्ष), पवन पाटील, माधव देसले(सल्लागार); श्रीमती निवेदिता सोनावणे,संतोष गुडेवार(उपाध्यक्ष),निलेश हरड(सचिव), राम शिंदे (खजिनदार),सुष्मा कुलकर्णी(सहसचीव),रविंद्र आडके,मारुती कांबळे(प्रसिध्दी प्रमुख)जगदीश वाघे,रमेश खैरे,दीपक बांगर (मार्गदर्शक)संघटनेचे राज्य शिक्षण सचिव रमेश तारमळे व केंद्रिय सदस्य अशोक साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व ठाणे विभाग अध्यक्ष नवनीत किल्लारीकर यांच्या मार्गदर्शनाने नव्याने प्रकल्प स्थरीय कमिटीची निवड करण्यात आली.सभेत विद्यार्थी व कर्मचार्‍यांच्या समस्यांचा अभ्यास व सभासद नोंदणीसाठी दौरा करण्याचे निश्चित करण्यात आले.सभेसाठी टेंभा आश्रमशाळेचे नागेश भांगरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!