मोनोरेलच्या डब्ब्याला आग : चाकरमण्यांचे हाल

मुंबई : वडाळयाजवळील म्हैसूर कॉलनी स्टेशनवर मोनोरेल उभी असतानाच ट्रेनच्या मागच्या डब्ब्याला अचानक आग लागल्याची घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलीय. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते.पहाटेच्यावेळी ट्रेनमध्ये गर्दी नव्हती त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळलीय. मोनोरेल स्टेशनवर उभी असतानाच हा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या प्रकारामुळे काही काळ या मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात आल्याने चाकरण्यामंचे हाल झाले. मोनोरेलला कारशेडमध्ये पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *