मुंबई दि.17 – तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

शासकीय नोकरीमध्ये, पोलीस भरतीमध्ये अडथळे दूर करण्यासाठी तसेच शासकीय नोकरीत काही जागा आरक्षीत ठेवून नोकरीची संधी देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत बांद्रा येथील कार्यलयात भेट घेतली. तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीत जागा आरक्षित करून त्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात दीपक सोनवणे, शमीभा पाटील, विकी शिंदे,निकिता मुख्यदल, ऋषिकेश राऊत यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!