काठमांडू, 27 मार्च : काठमांडू येथील भारतीय दूतावासाने दावा केला आहे की फरार खलिस्तान समर्थक कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग सध्या नेपाळमध्ये लपला आहे आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्याची विनंती हिमालयीन देशाच्या सरकारी यंत्रणांना केली आहे.
मिशनने 25 मार्च रोजी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत कॉन्सुलर सेवा विभागाला लिहिलेल्या पत्रात हा दावा केला आहे.
नेपालचे काठमांडू पोस्ट वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पत्रात हा दावा केला आहे…
“माननीय मंत्रालयाला विनंती आहे की त्यांनी अमृतपाल सिंगला नेपाळमधून कोणत्याही तिसऱ्या देशात जाण्याची परवानगी देऊ नये आणि या मिशनच्या सूचनांनुसार भारतीय पासपोर्ट किंवा इतर कोणत्याही बनावट पासपोर्टचा वापर करून नेपाळमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला अटक करावी, यासाठी इमिग्रेशन विभागाला कळवावे. “
सुत्रांनी दिलेल्य माहितिनुसार हा पत्र आणि फरारअमृतपाल सिंग याचे वैयक्तिक तपशील हॉटेल्सपासून एअरलाइन्सपर्यंत सर्व संबंधित एजन्सींना पाठवण्यात आले आहेत.
सिंग यांच्याकडे वेगवेगळ्या ओळखींचे अनेक पासपोर्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असताना हा प्रकार घड्ला आहे.
अमृतपाल सिंग, ज्यांच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे, 18 मार्चपासून त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध सुरू असूनही तो फरार आहे.