अध्यक्षपदी बजरंग वाळुंज तर सचिवपदी जान्हवी मोर्य !

डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा रविवारी मॉर्डन प्राइड हॉटेलमध्ये पार पडली. या सभेत सन 2023-24 सालाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी  पत्रकार  संघाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार तथा दैनिक पुढारीचे प्रतिनिधी बजरंग वाळुंज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नव्या कार्यकारिणीत श्रीराम कांदू (उपाध्यक्ष), जान्हवी मौर्य (सचिव ), प्रवीण गोरे (कोषाध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघाचे सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार सदाशिव उर्फ बापू वैद्य, अजय निक्ते, संतोष गायकवाड, मुरलीधर भवार, आकाश गायकवाड, सुरेश गायकवाड, प्रभू कापसे, देवेन शर्मा आदी उपस्थित होते.

डोंबिवली पत्रकार संघाचे संस्थापक स्व. श्रीकांत टोळ, स्व. विकास काटदरे आणि स्व. महेंद्रभाई ठक्कर यांची परंपरा पत्रकार संघाला लाभली आहे. डोंबिवलीतील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित संघ म्हणून हा पत्रकार संघ ओळखला जातो. संघातर्फे पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविणे, तसेच विविध विषयावर मान्यवरांचे वार्तालाप आयोजीत करून शहरातील पायाभूत सुविधा आणि समस्यांचे निराकारण कसे होईल, याकडे लक्ष वेधणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बजरंग वाळुंज यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!