होर्डिंग फाडल्याचा संशयातून साकीनाका येथे तरुणाची

हत्या घाटकोपर (निलेश मोरे) : साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परेरा वाडी येथे वाढदिवसाचे होर्डिंग फाडल्याचा राग मनात ठेऊन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आकाश लांडगे असे त्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश शेट्टी याला अटक केली असून इतर साथीदारांचा शोध सुरु आहे मृत आकाश लांडगे हा सुद्धा तडीपार आरोपी होता त्यामुळे होर्डिंगचे कारण समोर येत असले तरी या मागे गॅंगवार  दडला असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

प्रल्हाद शेट्टी या केबल व्यवसायिकाचा रविवार 5 नोव्हेम्बर रोजी वाढदिवस होता. त्यांचे बॅनर शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका परिसरात लावले होते. त्यातील एक होर्डिंग आकाश लांडगे याने फाडले असल्याच्या संशयावरून काल रात्री 10 च्या सुमारास आकाशला प्रथमेश शेट्टी आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करून जखमी अवस्थेत परेरा वाडी येथे फेकण्यात आले. जखमी आकाशला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला . या हत्येमुळे परेरा वाडी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. साकीनाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी घटना स्थळी भेट देत फरार आरोपींचा शोध घेत असून तडीपार असलेला आकाश साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत का आला होता याचा हि तपास पोलीस करत आहे असे पोलीस उपायुक्त नवीनचंद रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *