डोंबिवली रिपाइंकडून अनोखी भाऊबीज साजरी : सीमाताई आठवले  यांच्या हस्ते  2 हजार महिलांना साडी वाटप  
डोंबिवली : डोंबिवली शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. महिला नेत्या सीमाताई रामदास आठवले यांच्या हस्ते दोन हजार महिलांना साड्या वाटप करण्यात आले. डोंबिवली शहरात अश्या प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पार पडला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी रविवारी सर्वेश हॉल येथे भाऊबीज आणि बेरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रिपाईच्या महिला नेत्या सीमा ताई आठवले उपस्थित होत्या. रिपाईच्यावतीने अनोख्या भाऊबीज कार्यकमाचे आयोजन केल्याने सीमाताईंनी रिपाईचे शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचे कौतुक केले. तसेच वाढती लोकसंख्या आणि नोकऱ्या कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. तरुणांना नोकरी विषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन पार पडले. तसेच शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या प्रयत्नातून रिक्षा परमिट वाटप करण्यात आले. यावेळी आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, यवा अध्यक्ष जय जाधव, महात्मा फुले महामंडळ व चर्मकार महामंडळ जिल्हा व्यवस्थापक दिलीप दुथाडे, रिपाइंचे कार्याध्यक्ष किशोर मगरे, महिला शहरअध्यक्ष अपेक्षा दळवी, विठ्ठल खेडकर आदि डोंबिवली शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

असा रंगला सोहळा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *