सोलापूर : डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या कामाचे मोजमाप पुस्तकावर सही केल्याचा मोबदला म्हणून १३ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी महापालिकेतील सहाय्यक अभियंता सुनील लामकाने (वय ५७) यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले.
महापालिकेच्या गलिच्छ वस्ती सुधार योजना कार्यालयात ही कारवाई झाली. शेळगी ते स्मशानभूमी येथील रस्त्याचे काम केल्याचा मोबदला म्हणून सहा हजार , बारामती बँक ते आकाशगंगा मंदिर येथील रस्त्याचे डांबरीकरणाबद्दल सही करण्यासाठी ७ हजार असे १३ हजार लाचेची मागणी यांनी केली होती.