डोंबिवली : केंंद्रीय ग्राहक दक्षता पथक महाराष्ट्र उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सुभाष महाजन यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती दक्षता पथक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर करजीवकर यांनी त्यांची निवड केली आहे. ग्राहकांच्या हक्काविषयी असलेली तळमळ पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे.

डोंबिवलीकर सुभाष महाजन हे गेल्या अनेक वर्षापासून कला, क्रिडा, सांस्कृतीक, सामाजिक, शैक्षणिक, कामगार, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची आजीव मेंबरशिप त्यांना प्रदान करण्यात आली आहे. मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकार महाजन हे विविध क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणी फसगत करणार नाही.प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी असं ते सांगतात. पत्रकार सुभाष महाजन यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *