खाडी किनारी घडला प्रकार : पोलिसांची ५ पथके आरोपींचा शोध 

डोंबिवली : आपल्या मित्रासमवेत खाडीकिनारी फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीला पोलिस असल्याचे धमकवित दोघांनी तिच्यावर  केल्याची खळबळजनक घटना डोंबिवलीत घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोन अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या  शोधासाठी  पाच पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. 

 शुक्रवारी संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासोबत खाडीकिनारी फिरायला गेली होती. त्याचवेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्या दोघांना अडवले. आम्ही पोलीस आहोत. तुमच्या दोघांच्या कुटुंबीयांकडे तक्रार करू अशी दमदाटी करून दोघांना धमकावले. त्यानंतर त्या आरोपींनी मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या पाच वेगवेगळी टीम तयार करण्यात आल्या असून, ते जवळपासच्या सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!