हजारो दिव्यांनी उजळली कल्याण डोंबिवली
डोंबिवली : त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर शुक्रवारी डोंबिवलीत गणेश मंदिरात तर कल्याणात दुर्गाडी किल्ल्यावर दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लाखो हजारो दिव्यांनी कल्याण डोंबिवली उजळली हेाती. धार्मिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा दिपोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट हा क्लब गेली अनेक वर्षे गणेश मंदीर संस्थानच्या सहकार्याने दिपोत्सव साजरा करतो. या प्रसंगी अनेक सेवाभावी कुटुंबीय खाद्यतेलाचे दान केले . हे जमा झालेले तेल सेवाभावी व गरजू संस्थाना दान करण्यात येणार आहे. कल्याणात त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नयनरम्य रोषणाई करण्यात आली हेाती.
असा रंगला दिपोत्सव .. फोटो- राजन जोशी