विद्या बालनच्या हस्ते मुंबईत नव्या चित्रपटगृहाचे उदघाटन 

घाटकोपर ( निलेश मोरे ) : कोलकत्ता येथील पीव्हीआर ( पी एक्स एल ) प्रिमिअम एक्सट्रा लार्जच्या यशानंतर मुंबई मध्ये स्वदेशी हे लार्ज चित्रपट गृह सुरु करून पीव्हीआर या लि कंपनीने प्रेक्षकांना नववर्षाची भेट दिलीय . मुंबई उपनगरातील कुर्ला येथील पीव्हीआर मार्केट सिटी येथे हे स्वदेशी चित्रपट गृह सुरु केलय.  सुप्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते चित्रपटगृहाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी तुम्हारी सुलुचे कलाकार आर जे मलिष्का , नेहा धुपिया या अभिनेत्री उपस्थित होत्या . यावेळी तुम्हारी सुलु या चित्रपटाचे प्रमोशन देखील करण्यात आले . पीव्हीआर लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्त म्हणाले की पी एक्स एल चित्रपट गृहातून सिनेमाच्या क्षेत्रात नाविन्यता देण्याची आमची वचनबद्धता प्रतीत होते . उत्तम सिनेमा पाहण्याच्या अनुभवाची अधिकाधिक मागणी असणारी पश्चिम भागातील बाजारपेठ आमच्यासाठी नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे . पी एक्स एल या चित्रपट गृहामध्ये एक्सट्रा लार्ज वोल टू वोल स्क्रीन , अत्याधुनिक डॉल्बी एटमॉस , मूव्हिंग साउंड टेक्नॉलॉजी आणि ड्युअल 4 के प्रोजेक्शन सिस्टम आणि प्रेक्षकांना कस्टमाईज्ड 3 डी ग्लासेसमुळे सिनेमातील अगदी छोट्यातील छोट्या बाबी ठळकपणे दिसू शकेल असे गौतम दत्त यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *