हायटेंशनचा झटका लागून तीन कामगार  होरपळले     
बदलापूर  -बदलापूर पश्चिम  येथील  टाटाच्या हायटेंशन वाहिनीचा झटका लागून तीन कामगार होरपळले आहेत. टाटा काॅलनी परिसरातील साईश्रध्दा या इमारती जवळील इंटरनेट केबल टाकण्याचे काम सुरू असताना इंटरनेट वाहिनीचा संपर्क टाटाच्या हायटेंशन वहिनीला लागून झाल्याने आग लागली. यात विनोद अर्जुन शर्मा – वय  21  वर्ष , प्रविण हरीनाम मंडई – वय 19  वर्ष ,  संदिप शुभमनाथ पांडे – वय  19  वर्ष हे तीन कामगार जबरी होरपले आहेत.दोघांच्या हाताला आणि तर एकाच्या संपूर्ण शरीराला खोलवर जखमा झाल्या आहेत.   , या तिघांना   रमेशवाडी येथील  भगवती रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले आहे.    सदर इंटरनेट केबल कोणत्या ठेकेदाराची आहेत त्याचे नाव अजून समजले नसुन पोलीस  अधिक तपास करीत आहेत. या तीनही कामगारांच्या शरीराला खोलवर जखम झाली असून ते बरे होण्याकरिता एक महिन्याच्या कालावधी लागू शकतो असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!