डोंबिवली ;  पूर्वेतील सारस्वत कॉलनी परिसरातील श्री विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्था, गुरू मंदिर रोड येथे श्री विवेकानंद उत्कर्ष मंडळाच्या वतीने गेल्या ३८ वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.
यंदाच्या गणेशोत्सवाचे ३९ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळांनी स्वामींचे निवास स्थान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे औदुंबराचे झाड आणि त्याच जागेवर विराजमान अनंत कोटी ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ अशी देखाव्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे मंडळाचे अध्यक्ष जील मिराणी ,  सचिव प्रणव पाटील, खजिनदार अक्षय रासकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने झटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!