मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश
ठाणे : दिव्यात राहणाऱ्या बहुसंख्य कोकणी बांधवांना गणेशोत्सवासाठी दिवा स्थानकावरून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. याच मागणीला मध्य रेल्वे चे महाप्रबंधक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून गणपती उत्सवासाठी दिव्या मधून देखील विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील दिवा,कल्याण, डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोकण वासीय वास्तव्याला आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण वासीय गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. या जनतेसाठी विशेष दिव्या मधून गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती यानंतर रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी दिवा रोहा चिपळूण पर्यंत एक गाडी वाढवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
२५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीनुसार या ट्रेनमध्ये चार जीएस दिवा विभागासाठी आरक्षित करण्यात आले आहेत शिवाय सावंतवाडी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा सुरू आहे.तर ट्रेन क्रमांक १०१०५ दिवा स्टेशन वरून सकाळी ६:२५ वाजता सुटणार असून ती सावंतवाडी येथे १८:३० वाजता पोहचणार आहे.तर या विशेष गाडीचा परतीचा वेळ सावंतवाडी येथून २०:१० वाजता सूर होणार असून दिवा येथे ०८:२५ आगमन होणार आहे.
____________________________
गणपती उत्सवासाठी गाडी क्रमांक ६१०११ दिवा रोहा चिपळूणपर्यंत वाढवण्यात आली आहे.
वेळ असेल: दिवा उपनगर सकाळी ९:१०
रोहा आगमन ११:००
रोहा ११:०५ चिपळूण १३:२०
परतीच्या प्रवासात चिपळूण १३:२५ रोहा आगमन १६:१० वाजता आणि दिवा आगमन १८:४५ वाजता.
याशिवाय २५ ऑगस्ट रोजी गणपती विशेष गाडी क्रमांक ०११७१ ला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. माननीय आमदारांच्या मागणीनुसार, या ट्रेनमध्ये ४ GS डबे दिवासाठी लॉक केले जातील.
याशिवाय सावंतवाडीसाठी दिवा ते सावंतवाडी अशी रोजची सेवा चालवली जात आहे.
ट्रेन क्र. १०१०५ दिवा सकाळी ६:२५ ची सावंतवाडीला १८:३०
परतीचा प्रवास सावंतवाडी २०:१० वाजता आणि दिवा आगमन ०८:२५ वा.