मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलय. आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणायला लावा असं आव्हान देत सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेवर टीका केलीय .

मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला, यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंगे उतरावेच लागतील. सरकारला निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य केलं होतं. मशिदीवरील भोंगे बंद होत नसतील तर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. त्यानंतर घाटकोपरच्या परिसरात मनसैनिकांनी मशीदीसमोर भोंगेही लावले, काही तासातच हे भोंगे पोलिसांनी काढले.

कुर्ला येथे वंचित आघाडीच्या कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर निशाणा साधत राज ठाकरेंवर टीका केलीय. माझा तुमच्या वक्तव्यावर शंभर टक्के पाठीबा आहे. पण हे करायला एकही बहुजन मुलगा तिथे नकोय. राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा बोलायला लावावे, हीच एक अट असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले.अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा तिकडे नकोय असं सुजात आंबेडकर म्हणालेत. तुमचा संपलेला पक्ष हिंदु मुस्लिम दगलीवर उभा करू नका एवढी कळकळीची विनंती आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकार, पोलीस यंत्रणा सगळयांसमोर हे वक्तव्य केलय. त्यामुळे जर दंगल झाली तर तुम्हाला माहितीए कोणाला पकडायचे असेही सुजात आंबेडकर म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *