कल्याण : येथील एक्सपेरीया मॉल (Xperia Mall) ने You Deserve It या मोहिमेद्वारे अनोख्या पध्दतीने महिला दिन साजरा केला. यावेळी १०० हून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला.


सर्व वयोगटातील महिलांना खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफर, लाइव्ह संगीत सादरीकरण आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देण्यात आली होती. Xperia ने 100 हून अधिक महिलांचा सत्कार केला. समाजासाठी योगदान देणा-या महिलांचा समावेश होता. या “Sheroes” मध्ये डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, पोलीस, पत्रकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्त्या आणि आघाडीच्या अभिनेत्री सुष्मिता सिंग, यशश्री उपासनी, नम्रता प्रधान आणि विजया कदम यांच्यासह आगामी गायिका अक्षया अय्यर आणि अंशिका चोणकर यांचा समावेश होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केडीएमसीच्या अभियंत्या रोहिणी लोकरे डोंबिवली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली जोगळेकर, अग्रणी मॉडेल आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. पौर्णिमा भट आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या अनोख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी कलाकार सुप्रसिद्ध निवेदक प्रणव भांबुरे यांनी केले. आठवणीत राहील अशी संध्याकाळ सर्व महिलांनी अनुभवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *